प्रतिनिधी – बारामती शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अविनाश तानाजी बांदल यांची निवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी युवकचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले यांनी ही निवड जाहिर केली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी बारामतीत पदाधिकारी बदल केले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी जय पाटील यांची निवड करण्यात आली. त्यानंतर आता राष्ट्रवादी युवकच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी अविनाश बांदल यांच्यावर देण्यात आली आहे.

अविनाश बांदल हे दुर्गभ्रंमती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय असतात. विविध सामाजिक उपक्रम राबवून लोकोपयोगी कामे करण्यावर बांदल यांचा भर असतो. वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, विविध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे अविनाश बांदल यांनी यशस्वीरित्या आयोजन केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष युवकांमध्ये लोकप्रिय व्हावा आणि युवक संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेणार असल्याचे अविनाश बांदल यांनी म्हटले आहे. पक्षाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बांदल यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी त्यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी सोशल मिडीया सेलचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed