प्रतिनिधी – बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बारामती नगरपालिका व विशाल जाधव मित्र मंडळ यांच्या संयुक्त नियोजन अंतर्गत काल बारामती शहरातील देसाई इस्टेट भागात स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन राष्ट्रवादी काँग्रेस चे बारामती शहराध्यक्ष जय पाटील यांच्या शुभहस्ते करुन सुरवात केली, मुख्याधिकारी श्री महेश रोकडे, शहर युवक अध्यक्ष अविनाश बांदल, सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, श्री पोपटराव जाधव. आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती समीती बारामती अध्यक्ष राहुल मदने, श्री पाटील, रविंद्र पांडकर, प्रविण बोरा, सचिन मोरे, शंकर घोडे, गणेश जाधव, सुरेश झगडे, विक्रांत सप्रे, मंगेश खांडेकर, दत्तात्रय जाधव, अरुण जाधव, अमर अवघडे, अक्षय जाधव, बाबा कांबळे उपस्थित होते. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी उपस्थित नागरिकांना आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले. व देसाई इस्टेट परिसर स्वच्छ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed