माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) दि 9 ऑगस्ट – दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म्स ऑर्गनायझेशन मुंबई यांचे वतीने श्री प्रल्हाद गुलाबराव वरे, रा-मळद, ता – बारामती, जिल्हा-पुणे यांना “छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. मा.श्री कल्याणजी जाना (संस्थापक- चेअरमन, दादासाहेब फाळके आयकॉन अॅवॉर्ड फिल्म्स मुंबई.), मा सोनम पाटील (सचिव, दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड फिल्म मुंबई), मा.खासदार सुनील गायकवाड व अभिनेत्री चारूल मलिक यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण झाले, हा पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिला जातो, त्याचा वितरण समारंभ ता. २५/०५/२०२१ रोजी होणार होता, परंतु कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्याने हा पुरस्कार दि ०६/०८/२०२१ रोजी होटेल ऑरचिड, सहारा एअरपोर्ट मुंबई. येथे संध्याकाळी ४ ते रात्री १० च्या दरम्यान मोठ्या दिमाखदार वातावरणात संपन्न झाला..!
प्रल्हाद वरे हे बचत गट, शेतकरी समुह, शेतकरी मंडळ व बारामती फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड मळद-बारामती. च्या मार्फत कोरोनाच्या महाभयंकर संकटात गेली कित्येक दिवस शहरवासियांना होम डिलीव्हरी व्दारे ताजी व विषमुक्त “भाजी बास्केट” पोहच केली व शेतावर स्टाॅल उभारून शेतमालाचे मार्केटिंग केले. तसेच आसपासच्या गावातील ताजी व विषमुक्त भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये शहरवासीयांना घरपोच अशी विक्री व्यवस्था शेतकर्यांना बरोबर घेऊन उभारली, त्याकामाची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. याप्रसंगी अँकर सिमरन आहुजा, अभिनेत्री चारूल मलिक, अभिनेत्री पायल घोष, रामभाऊ जगताप, सुभाष मदने, बाळासाहेब घोरपडे, अधिकराव देशमुख, अशोक वरे व संजय पवार इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *