बारामती : (प्रतिनिधी : रियाज पठाण.) बारामती मधील मंडई मध्ये काही प्रवेशद्वार येथे कचरा टाकल्यामुळे ,व तो नगरपालिकेकडून न उचल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच मंडई पार्किंग मध्ये व्यसनी लोकांनी दारूच्या काचेच्या बाटल्या, वाहन पार्किंग मध्ये टाकल्या आहेत. तसेच व्यसनी लोकांनी या ठिकाणी चं लघवी व शौचास बसून ,व गुटखा तंबाखू खाऊन,या परिसरात घाण केली आहे. त्यामुळे याठिकाणी दुर्गंधीयुक्त वास येत असून,या पार्किंग मध्ये येण्या-जाण्याची इच्छा सुध्दा होत नाही. अशी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तरी बारामती नगरपरिषद यांनी या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमला असून सुध्दा याचा काहीही उपयोग होत नाही.व सफाई कर्मचारी यांचे मंडई परिसर मधील प्रवेशद्वार व मंडई पार्किंग कडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *