प्रतिनिधी – बारामती तालुक्यात कृषी विभागामार्फत लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्याची मोहीम तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये सुरू आहे दिनांक 3 12 2022 रोजी उंडवडी कडे पठार येथील भैरवनाथ विद्यालयात ची इयत्ता नववी मध्ये शिकणारे शाळेतील विद्यार्थी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी तसेच उपविभागातील महिला कर्मचारी यांच्या माध्यमातून वनराई बंधारा उभारण्यात आला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीच्या पावसाचे पाणी नाल्यांमधून मधून वाहून जाते असे वाहून जाणारे पाणी रिकामी सिमेंटची पोती किंवा इतर पोत्यामधे माती किंवा वाळु भरून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करून आडवा बांध घतला गेला. या पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिके ज्वारी हरभरा गहू यांना होणार आहे तसेच काही प्रमाणात विहिरीचे पाणी पातळी वाढण्यासही मदत होईल तरी अशा प्रकारचे जास्तीत जास्त वनराई बंधारे लोकसहभागातून उभारण्या चे आवाहन माननीय तालुका कृषी अधिकारी सौ सुप्रिया बांदल यांनी केले आहे कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहायक माधुरी पवार यांनी केले.