बारामती दि. २७. युनिक जी चॅम – अबॅकस क्लासेस कसबा बारामती येथील, संचालिका सौ. अमृता कोंढाळकर यांनी विद्यार्थ्यांचे अंकगणित सुधारावे, एकाग्रता, स्मृती यांचा विकास व्हावा, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढीस लागावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून क्लासची स्थापना केली . अल्प काळातच या क्लासमधील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेत यश मिळाले .जी- चॅम्प राज्यस्तरीय अबॅकस ऑनलाइन परीक्षा दि. २९,३० सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आली. या परीक्षेत पहिल्या लेवल मधील विद्यार्थी कु. अनन्या अमोल भगत हिने फक्त १३ मिनिटामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून सेकंड रँक मिळविला त्यासाठी तिला ट्रॉफी, मेडल ,सर्टिफिकेट मान्यंवरांच्या हस्ते देण्यात आले. कु.स्वरा गणेश तावरे हिने फक्त १४ मिनिटात १०० पैकी १०० गुण मिळवून थर्ड रँक पटकाविला . त्याबद्दल तिला ट्रॉफी ,मेडल, सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. चि. अजिंक्य संदीप जायपत्रे ,कु. अनघा दिनेश गायकवाड ,चि. पार्थ शरद देवकाते, कु. प्रांजली प्रमोद भगत , कु. सारिका संजय कुलकर्णी, शालमली दीपक जगताप ,कु. स्नेहल अजय सरडे या सर्व विद्यार्थ्यांनी चॅम्पियन प्राप्त केले, तसेच मेडल आणि सर्टिफिकेट मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमाच्या सुरुवातीला कु.सारिका कुलकर्णी इयत्ता ३ री. हिने गणेश वंदना सादर केली .लेवल पहिली व दुसरी या विद्यार्थ्यांनी अबॅकस प्रात्यक्षिक सादर केले. जिजाऊ ब्रिगेड पुणे पूर्व विभाग सचिव प्रा सुषमा जाधव यांनी ‘जागरूक पालकत्व’ या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले .बाल कल्याण केंद्राचे संस्थापक अध्यक्ष बालरोग तज्ञ डॉ. अनिल मोकाशी यांनी आपल्या मनोगतात बालकांच्या बुद्धीचा आणि स्मरणशक्तीचा विकास कसा होतो. यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी बालकल्याण केंद्र संस्थेच्या खजिनदार , डॉ. माधुरी मोकाशी (स्त्रीरोगतज्ञ), वाणिज्य विज्ञान आणि संगणक शिक्षण महाविद्यालय शिवनगर येथील प्राचार्य डॉ. अजित चांदगुडे , सौ. चांदगुडे मॅडम, स्मृतिका अकौंटन्सी क्लासेस संस्थापिका प्रा. बिना तावरे, जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका उपाध्यक्षा प्रा.शारदा मदने , सौ प्रतिमा सुर्वे, इ. मान्यंवर उपस्थित होते. पालक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक सौ. अमृता कोंढाळकर यांनी केले. सूत्रसंचालन जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुका सचिव सौ शीलाराणी रंधवे यांनी केले. आभार प्रदर्शन जिजाऊ ब्रिगेड बारामती तालुकाध्यक्षा सौ. विद्याराणी चव्हाण यांनी केले.