प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व जुनिअर कॉलेज बारामती येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले महात्मा फुलें विषयी विद्यार्थ्यांमधून अथर्व गायकवाड व अथर्व आटोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी प्रियंका कदम यांनी महात्मा फुले यांनी प्रथम रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्या समाधीचा जीर्णोद्धार केला तसेच महात्मा फुलेंनी महिलांसाठी केलेले कार्य सर्वांसमोर मांडले.
अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्य बी. एन. साहेब यांनी सांगितले की डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाज मधून प्रेरणा घेऊन बहुजन समाजासाठी काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
या कार्यक्रमास सर्व अधिकारी शिक्षक -शिक्षकेतर वृंद विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन सुनीता जाधव यांनी केले सूत्रसंचालन सुजित जाधव तर आभार पर्यवेक्षक बाळकृष्ण सुतार यांनी मानले.