प्रतिनिधी – बारामती जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये राधेश्याम एन . आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती च्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले.
14 वर्षे वयोगटांमध्ये 48 किलो वजन गट या प्रकारात 1) वीर केदार जाधव 7वी क, 2) 52 किलो वजन गट प्रकारात, पवन भाऊसाहेब पडळकर, 3)68 किलो वजन गट, साईराज दीपक गायकवाड, 17 वर्ष वयोगट 65 किलो वजन गट प्रकारात, साईराज केदार जाधव हे सर्व विद्यार्थी बारामती तालुकास्तरावर प्रथम आले असून या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर बुद्धिबळ स्पर्धेत कु.समीक्षा मंडले हिचा प्रथम क्रमांक आला असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनीला मार्गदर्शन सौ.मीनाक्षी वाघमारे यांनी केले. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य माननीय श्री सदाशिव (बापू) सातव तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पोपट मोरे , उप मुख्याध्यापक श्री. कल्याण देवडे , पर्यवेक्षक श्री निवास सणस ,आजीव सदस्य श्री अर्जुन मलगुंडे व उपस्थित सर्व शिक्षकांनी केले. या विद्यार्थाना मार्गदर्शन गुरुकुल प्रमुख श्री अरविंद मोहिते यांनी व क्रीडा शिक्षक श्री सुदाम गायकवाड यांनी केले.