रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन प्रियंका कदम यांनी केले. संविधानाविषयी प्राध्यापक विशाल सरतापे यांनी विद्यार्थ्यांना समाजवादी ,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य तसेच सामाजिक, आर्थिक, राजनैतिक ,न्याय, स्वातंत्र्य ,समता, बंधुता याविषयीची सविस्तर माहिती दिली.अध्यक्षीय भाषणात मा. प्राचार्य बी. एन. पवार यांनी भारताचे संविधानाविषयी माहिती दिली या कार्यक्रमास विद्यालयाचे उपप्राचार्य पी. एन. तरंगे पर्यवेक्षक बी.ए.सुतार सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजित जाधव यांनी केले तर आभार पर्यवेक्षक श्री बाळकृष्ण सुतार यांनी केले