माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे ) शनिवार दि. २६. ११. २०२२ रोजी दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये ७३ वा संविधान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,अनुसया इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसी आणि इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आणि रिसर्च फॉर गर्ल्स या महाविद्यालयामार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ, संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राणा सूर्यवंशी, संस्थेच्या सचिव सौ.माया झोळ, संस्थेचे कार्यकारी अधिकारी डॉ.विशाल बाबर, विभागीय संचालक डॉ.शरद कर्णे, अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य डॉ. अप्पासो केस्ते, फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ.सुनील हरेर, प्रा.ज्योती जावळे, प्रा.अमित पोंदकुले, एमसीए विभागप्रमुख प्रा.श्रीकांत साळुंके यांच्यासह संस्थेतील सर्व विभागाचे कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सदर दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी संविधानाचे सामूहिक प्रास्ताविक वाचन केले. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी संविधान दिनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,मुंबई या ठिकाणी झालेल्या त्यावेळी हल्यामध्ये ज्या जवानांनी व पोलीस कर्मचारी यांनी धाडस करून प्राणाची परवा न करता महाराष्ट्र राज्य व भारत देशा करिता लाखो लोकांचे प्राण वाचवून आपले बलिदान दिले व राज्यावरील संकट टाळले.
तसेच दि. २६/११/२००८ रोजी मुंबई येथे येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या जवानांना, पोलिसांना व नागरिकांना दोन मिनिटे स्तब्ध उभारून श्रद्धांजली वाहण्यात आली. व त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.हरिष अवचट, सूत्रसंचालन सौ.संगीता खाडे यांनी तर आभार डॉ.सुदर्शन नागराळे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed