बारामती दि. २५ : बारामती कृषि उपविभागामार्फत एकरी १०० टन ऊस उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन अभियान २९ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत गावपातळीवर शेतकरी मेळावे, चर्चासत्र व प्रात्यक्षिके इत्यादींचे नियोजन केलेले असून तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
बारामती, दौंड, इंदापूर व पुरंदर या तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी १०० टन ऊस उत्पादन व ऊस पाचट व्यवस्थापन अभियानात सहभाग नोंदवून तज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.