बारामती, प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ या ठिकाणी इनर व्हील क्लब पुणे रिव्हर साईड , पुणे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा देऊळगाव रसाळ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वेटर चे मोफत वाटप करण्यात आले. सर्व मुलींसाठी लेगीज चे मोफत वाटप करण्यात आले आणी शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना बिस्कीट वाटप सुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री दिपक नाना वाबळे व अरुण रसाळ यांच्या पाठपुराव्याने व मा. श्री. राजकुमार मगर यांच्या सहकार्याने शाळेतील सर्व मुलांना गेल्या दोन महिन्यापूर्वी मोफत शालेय बुटांचे वाटप करण्यात आले होते.
इनर व्हील क्लब पुणे रिव्हर साईड पुणे यांच्या वतीने देऊळगाव रसाळ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील महिला पालक व गावातील महिलांसाठी मोफत शिवण क्लासेस , रांगोळी क्लासेस व महिला सबलीकरण यासाठी मोठे काम केले जाईल असे माधवी चंदन व निरंजना मगर यांनी सांगितले.
देऊळगाव रसाळ जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ही इनर व्हील क्लब पुणे रिव्हर साईड पुणे यांनी दत्तकच घेतली आहे. आपल्या अडचणी सांगा आम्ही आमच्या वतीने जेवढे जास्तीत जास्त मदत करता येतील याचा प्रयत्न करू असे रीतु तायल व आशा आगरवाल यांनी सांगितले.
यावेळी इनर व्हील क्लब पुणे रिव्हर साईड , पुणे च्या चेअरमन माधवी चंदन , निरंजना मगर , रीतु तायल , आशा आगरवाल , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिपक नाना वाबळे , अरुण रसाळ , बापूराव कांबळे , शिवाजी रसाळ , अजित वाबळे , बाळकृष्ण रसाळ , बाळासाहेब कदम , राजेंद्र पवार , प्रकाश रावडे , आदी पालक व महिला उपस्थित होत्या.