बारामती : भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती नगरपरिषद समोर धरणे आंदोलन सुरू केले होते. बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती शहर अध्यक्ष निखिल भाई खरात यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीची गरज आहे. तसेच स्मारकाची स्वच्छता करताना देखील शिडी/ हायड्रॉलिकची गरज आहे. याविषयी दिनांक १४/०९/२०२२ रोजी पहिले निवेदन दिले होते. त्यानंतर 15/11/2022 रोजी दुसरे निवेदन दिले होते. सदर निवेदनावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून सोमवारी दिनांक २१/११/२०२२ रोजी बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. बारामती नगर परिषद मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी लेखी पत्र देऊन दोन महिन्यात हायड्रॉलिक शिडीचे काम करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले. यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अस्लम वस्ताद शेख, बारामती शहर अध्यक्ष निखिल खरात, संघटनेचे सदस्य विराज औदुते, समीर खान व किशोर मोरे सामजिक कार्यकर्ते सेवक अहिवळे, सामजिक कार्यकर्ते सुलतान ग्रुप संस्थापक अध्यक्ष हसन ( भाई ) शेख, इम्रान पठाण, हेमंत कांबळे, योगेश महाडिक, प्रतिक चव्हाण आणि पदाधिकारी उपस्थित होते.