पुणे दि.१७- खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरिता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आलेली होती. परंतु मागील हंगामाचा विचार करता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी पुरेशी झालेली नसल्याने चालू हंगामात पुरेशा प्रमाणावर शेतकरी नोंदणी व्हावी याकरीता ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

शासनामार्फत हंगाम २०२२-२३ साठी साधारण दर्जाचा धानासाठी २ हजार ४० रुपये “अ” दर्जाच्या धानासाठी २ हजार ६० रुपये प्रती क्विंटल तसेच भरडधान्य मकासाठी १ हजार ९६२ रुपये क्विंटल दर शासनाकडून निश्चीत करण्यात आला आहे. चालू हंगामामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed