विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’

प्रतिनिधी – विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मा. शरदचंद्रजी पवार व सौ. प्रतिभा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोमवार दि. १२ डिसेंबर २०२२ व मंगळवार दि. १३ डिसेंबर २०२२ रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे २१ वे वर्ष आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ( निवड चाचणी ) ऑनलाइन LIVE सादरीकरण पद्धतीने कनिष्ठ विभाग २ डिसेंबर २०२२ व वरिष्ठ विभाग ३ डिसेंबर २०२२ रोजी मराठी भाषेतूनच सादर होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या वेबसाईटवर गुगल फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तो भरून स्पर्धेमधील आपला सहभाग नोंदवावा. गुगल फॉर्म बरोबर महाविद्यालयाच्या मा. प्राचार्यांचे पत्र व विद्यार्थ्याचे ओळखपत्र जोडावे.

सोमवार दि. १२ डिसेंबर २०२२ रोजी कनिष्ठ विभागाची व मंगळवार दि.१३ डिसेंबर २०२२ रोजी वरिष्ठ विभागाची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल. याबाबत सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर वेळोवेळी दिली जाईल. या स्पर्धेसाठी ६+२=८ मिनिटे वेळ देण्यात आला असून वरिष्ठ विभागासाठी रू.११०००, रू. ७०००, रू.३००० व रू.१००० आणि कनिष्ठ विभागासाठी रू.१००००, रु.५०००, रू.२०००, रू.१००० अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. दोन्ही विभागांसाठी सांघिक स्तरावर स्वतंत्र ‘प्रतिभा सन्मानचिन्ह’ देण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ.आनंदा गांगुर्डे यांनी दिली.

बारामतीची ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ ही अखिल महाराष्ट्रात वक्तृत्वाचा मानदंड म्हणून नावारुपास आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी या गाजलेल्या स्पर्धेत सहभागी होत असतात.

कनिष्ठ विभागासाठी विषयः
१. पसायदान आणि विश्वशांती
२. सण – उत्सवांचे बाजारीकरण
३. कोरोनाची लस आली पण माणुसकीची लस कधी ?
४. खादी …वस्त्र नव्हे विचार
५. करू जागर मराठीचा …

वरिष्ठ विभागासाठी विषयः
१. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची आव्हाने
२. मरण स्वस्त होत आहे …!
३. जी.ए. : साहित्य प्रवासातील गूढयात्री
४. नित्य नव्या आव्हानांना भिडणारा लोकनेता – मा. शरद पवार
५. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सत्यशोधक चळवळ

अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाईट vpasccollege.edu.in पाहावी .
अधिक माहितीसाठी मराठी विभाग प्रमुख आणि या स्पर्धेचे कार्याध्यक्ष डॉ. आनंदा गांगुर्डे (8149142453), डॉ. श्रीराम गडकर (9764850035 ), प्रा. सुनील डिसले (9960248517), प्रा. नंदकुमार खळदकर (8975062897), प्रा. शिवाजी टकले (9860993219) यांच्याशी संपर्क साधावा , असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *