प्रतिनिधी – राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व हरभरा गहू बिजोत्पादन कार्यक्रम आज दिनांक 16,11,2022 रोजी वरवंड ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी महाबीज कंपनीचे मार्गदर्शक श्री अभय अष्टनकर जिल्हा व्यवस्थापक तसेच अमरसिंह जगदाळे कृषी क्षेत्राधिकारी तसेच बांदल मॅडम यांनी गहू व हरभरा बियाणे ग्राम बीज उत्पादन कार्यक्रम याविषयी मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य व कडधान्य बियाणे शासकीय अनुदान विषयी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय श्री राहुल दादा रामदास दिवेकर व्हाईस चेअरमन कात्रज दूध संघ, बाळासाहेब जगताप उपसरपंच वरवंड तसेच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील व शेतकरी उपस्थितीत होते उपस्थित शेतकऱ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी हरभरा बियाणे परमिट मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले राहुल लोणकर कृषी सहाय्यक वरवंड यांनी उपस्थित आमचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *