प्रतिनिधी – बारामती मधील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी कृष्णाई लॉन्स तांदुळवाडी रोड बारामती येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती श्री गणेश इंगळे सर, यांच्यासह मार्गदर्शक प्रसिद्ध व्याख्याते श्री गणेश शिंदे व सर्व कर्मचारी वृंद, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक बि.आर.घाडगे सर, प्राध्यापक एस. टी. काळे सर यांनी उपस्थित मान्यवरांना व पालकांना मार्गदर्शन केले.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे जागृत नागरिक बनून जेव्हा समाज जागृती करतील तेव्हाच शिक्षणाचा खरा उपयोग होईल व चांगला समाज घडेल असे मत यावेळी गणेश इंगळे यांनी व्यक्त केले.
