प्रतिनिधी – बारामती नगरपरिषद मार्फत स्वातंत्र्य सेनानी वल्लभ भाई पटेल यांची दि.31 ऑक्टोबर 2022 रोजी जयंती साजरी करण्यात आली. हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून देशभर साजरा केला जात आहे. राष्ट्रीय एकता आणि आझादी का अमृत महोत्सवाचा संदेश देशभरात पोहोचवण्याच्या उद्देशाने बारामती नगरपरिषद मार्फत राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रम घेण्यात आला. सदर एकता दौड मार्ग बारामती नगरपरिषद ते पंचायत समिती बारामती यामार्गे घेण्यात आला. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री. दादासाहेब कांबळे, तहसीलदार श्री. विजय पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, जय जवान माजी सैनिक संघटनेचे सदस्य, व गणेश मंडळ सदस्य उपस्थित होते. सर्वांनी राष्ट्रीय एकता शपथ घेऊन स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आपल्या राष्ट्राची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी व बळकट करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमाणसात दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed