बारामती : बारामती ऍग्रो साखर कारखाण्याचे दुषित रसायनिक युक्त पाणी हे उघडयावर राजेरोसपणे सोडले गेलेलं आहे त्या दुषित पाण्याची कोणत्याही प्रकराची काळजी न घेता हे पाणी बंदिस्त स्वरूपात नसून उघडयावर 2 ते 3 किलोमीटर असच बेवारस सोडलं गेलेलं आहे या दुषित पाण्याचा इतका ऊग्र व दुर्गणधियुक्त वास येत आहे की सि. निंबोडी ते शेटफळगडे या रस्त्याने प्रवास करणं आता जिकरीचं झाल आहे व आरोग्यला हानिकारक झाला आहे. एवढंच नव्हे तर संबंधितांनी निष्कळजीपनाचा कळस गाठला आहे हे पाणी थेट निंबोडी येथील सार्वजनिक तलाव आहे त्या तलावाच्या पाण्याचा वापर हा वन्यजीव, पशुपक्षी, जनावरे, शेती, आणि अन्य कामासाठी होतो त्या तलावात राजेरोसपणे सोडलं गेलेलं आहे. संबंधित अधिकारी यांना वेळोवेळी लेखी – तोंडी तक्रार करूनही अद्यापही त्यावर कोणतेही कार्यवाही झालेली नाही निंबोडी येथे गायरानातील ओढा आहे तेथे हे पाणी मोठया प्रमाणात साठलेला आहे गायरानातील पशु पक्षी वन्यजीव व सजीवांना आता हे पाणी पिण्यायोग्य राहिला नाही कारखाना हा जाणूनबुजून करोडो रुपये कमवून सजीव व प्राण्याचा आरोग्यशी आणि जीवाशी खेळत आहे म्हणून मी बारामती मा. प्रांत , तहसीलदार , आरोग्य अधिकारी व निंबोडी येथील ग्रामपंचायत यांना लेखी स्वरूपात तक्रार दाखल दिली आहे जर लवकरात लवकर संबंधित अधिकारी व कारखाण्यावर कारवाई नाही झाली तर मी अमरण उपोषण करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सुरज सवाने यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.