भिगवण प्रतिनिधी: तक्रारवाडी येथील डोंगर माथ्यावर असलेल्या थाडेश्वर मंदिरामध्ये भिगवण सायकल क्लब यांच्यावतीने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले, यावेळी शेकडो दिवे त्या ठिकाणी प्रज्वलित करण्यात आले. या दिव्यांमुळे थाडेश्वर मंदिर परिसर उजाळून निघाला.
येथील सायकल क्लबच्या वतीने नेहमीच सांस्कृतिक व समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दिवाळीनिमित्त मंदिर परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला सायकल क्लबचे अध्यक्ष केशव भापकर, खजिनदार राहुल गुंदेचा, प्रवीण वाघ, अल्ताफ शेख,नामदेव कुदळे, योगेश चव्हाण, प्रसाद पाटील, हुजेफ शेख, आयन शेख तसेच सुषमा वाघ,परवीन शेख, रेहाना शेख, जस्मिन शेख, तस्लिम शेख,समृद्धी भापकर, पूजा चव्हाण, इकरा शेख, आसमन शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.