योजनेचे स्वरूप

नैसर्गिक घटकांना हानी न पोहोचविता त्यांचा योग्य वापर करणे व जमिनीची सुपीकता वाढवून दीर्घकाळ टिकविणे यासाठी या योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येते.

योजनेच्या अटी

◆निवड केलेल्या गावसाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
◆अर्जदाराचा ७/१२ व ८अ च्या छायांकित प्रती.
◆अनुसूचित जाती व जमाती करीता जातीचा पुरावा.
◆विधवा, परितक्त्या असल्यास तसे प्रमाणपत्र.
◆आधार कार्डची छायांकित प्रत.

योजनेअंतर्गत लाभ

●गांडूळ खत उत्पादन युनिट नापेड कंपोस्ट खत उत्पादन युनिटच्या १० हजार रुपयांच्या प्रकल्प खर्चास : ०-२ हेक्टरसाठी ७५ टक्के प्रमाणे ७ हजार ५०० रुपये व २-५ हेक्टरसाठी ६५ टक्के प्रमाणे ६ हजार ५०० रुपये अनुदान देण्यात येते.

●सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिटच्या ६ हजार रुपयांच्या प्रकल्प खर्चास : ०-२ हेक्टरसाठी ७५ टक्के प्रमाणे ४ हजार ५०० रुपये व २-५ हेक्टरसाठी ६५ टक्के प्रमाणे ३ हजार १०० रुपये अनुदान देण्यात येते.

अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed