माळेगाव (प्रतिनिधी, गणेश तावरे) बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एमआयडीसी परिसरामध्ये मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. दिनांक 4/10/2022 रोजी श्री संजय श्रीमंत मसतुद मॅनेजर आय एस एम टी कंपनी एमआयडीसी बारामती जिल्हा पुणे यांनी आय एस एम टी कंपनी मधील सुमारे 26,00,000/-लाखाचे लोखंडाचे रोल दिनांक 20/9/2022 ते 4/10/2022 चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तारेच्या कंपाउंड मधून प्रवेश करून चोरून नेल्याबाबत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी त्यांचे तपास पथकास सदर चोरट्यांना लवकरात लवकर शोधून काढण्याबाबत सक्त सूचना व मार्गदर्शन केले होते. त्यावरून तपास पथकातील पोलीस अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरुटे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मदने, शशिकांत दळवी व दिपक दराडे यांनी रात्रंदिवस आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकास गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. आय एस एम टी कंपनीमध्ये सेक्युरिटी म्हणून नोकरी करत असलेला कैलास शांताराम लष्कर रा. राक्षेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर याने आपल्या गावाकडील तीन साथीदार 1. आकाश लहू ननवरे वय 21 वर्ष 2. आशिष कांतीलाल लष्कर वय 20वर्ष 3. आकाश सुनील जाधव. वय 19 वर्ष सर्व रा. राक्षेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. यांच्या मदतीने सदर लोखंडी रोलची चोरी केली. चोरलेले लोखंड बारामती येथील 1. सलमान इम्तियाज खान वय 26 वर्ष राहणार बारामती जिल्हा पुणे. 2. धर्मेंद्र कुमार राजकुमार चौधरी वय 38 वर्ष राहणार भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे या दोघांना विकले. त्यांनी सदरचे लोखंड पुढे जालना या ठिकाणी तेजस सुरेश लोंकलकर उर्फ तेजा शेठ वय 40 वर्ष रा. तुळजाभवानी नगर जालना याला विकले. वरील आरोपी यांना राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथून तसेच बारामती येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तसेच जालना येथून तेजस लंकनकर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. तपास अधिकारी स पो नी शेंडगे, सपोनी श्री राहुल घुगे व बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथक हे जालना येथे पोहोचले गुन्हेगारांना तर पकडलेच जालना येथून सदर गुन्ह्यातील 100 % रिकवरी करून लोखंड जालन्यावरून परत बारामती ला आणले . त्यामुळे गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन मिळून 31,00,000 /- रुपये रिकवरी करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे एमआयडीसी मधील सर्व कंपन्यातून बारामती तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते, बारामती विभाग पुणे ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश लंगुटे , श्री राहुल घुगे , महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलीस हवा. राम कानगुडे . पोलीस नाईक अमोल नरुटे , पो. कॉ. दत्ता मदने ,शशिकांत दळवी, दिपक दराडे , महिला पोलीस कॉन्स्टेबल रचना काळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी शेंडगे बारामती तालुका पोलीस स्टेशन या करीत आहेत .