प्रशासनाच्या वतीने नदी जवळील लोकांना सतर्कतेचा इशारा ..

प्रतिनिधी – आगामी दोन दिवस असणाऱ्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर बारामती करांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अचानकपणे पाणी वाढल्याने आपल्या ओळखीचे रस्ते ठिकाणही पाण्याखाली जातात आणि मग आपण या गोष्टी सहजपणे घेतो आणि पुरातील पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला पाण्याच्या वेगाचा आणि प्रवाहाचा अंदाज येत नाही त्यामुळे अनुचित प्रकार होऊन. सणासुदींच्या दिवसांमध्ये. आपल्यावर संकट येऊ शकते. त्यामुळे कुणीही पाण्याबाबत फाजील आत्मविश्वास बाळगू नये. नगरपालिका पोलीस पोलीस पाटील यांच्या सूचना आपण पाळाव्यात. सेल्फी काढणे किंवा पुराच्या कडेला उभे राहणे दगडीवर उभे राहणे यासारख्या घटना टाळाव्यात त्यामुळे अपघात होऊ शकतो. बारामती शहरात दिंडी पट्टा मळद ब्रिज गुणवडी खंडोबा नगर. या भागात नागरी वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता असल्याने त्या भागातील लोकांनी पूर्वीची पूर पातळी लक्षात घेऊन अगोदरच आपापली घरे दुकाने व्यावसायिक ठिकाणी येथील मालमत्ता हलवावी. या वृक्ष जर कुणाला मदत लागली तर तात्काळ पोलीस मदतीसाठी डायल 112 तात्काळ कॉल करा आपल्याला दहा मिनिटात मदत पोहचेल. असे आवाहन शहर पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *