भिलारवाडीच्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी बाळासाहेब ताम्हणे

प्रतिनिधी – दि.15 भिलारवाडी ता. बारामती येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बाळासाहेब सोपान ताम्हणे यांची बिनविरोध निवड नुकतीच झाली. सरपंच सत्वशीला जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी घेण्यात आलेल्या सभेमध्ये सर्वानुमते बाळासाहेब ताम्हणे यांचे नाव आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच कल्याण चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुभाष भिलारे, अतुल भिलारे, आशा खोमणे, अलका पोंदकुले, सुप्रिया काळाणे, तसेच मावळते अध्यक्ष हनुमंत वायसे, ग्रामसेवक अजित जाधव, तलाठी प्रियांका टिळेकर, गोरख चौलंग, हनुमंत पवार, शिवाजी पवार, सुनील भिलारे, राजेंद्र जगताप, गोरख चव्हाण, सागर चव्हाण, युवराज ताम्हाणे, नवनाथ ताम्हणे, संतोष कदम, तसेच गावातील ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *