पत्रकारांना धमकी देत असभ्य वर्तन करणाऱ्या दुकानदारावर कारवाही करा – पत्रकार संघटनेची मागणी

प्रतिनिधी – बारामती येथील भिगवण रोड एलआयसी ऑफिस शेजारील रिषभ इलेक्ट्रिकल्स चा दुकानमालक व दुकानातील महिला हे दोघे मिळून एका ग्राहकाची फसवणूक करत असल्याचे समजताच त्या दुकानात जाऊन सदर घटनेबाबतची शहानिशा करत असताना दुकानमालक केवल शहा व तेथील महिला यांनी पत्रकारांचा मोबाइल हिसकावून घेत पत्रकार बांधवांना दुकानातून हाकलून दिले त्यानंतर तेथून काही वेळातच फसवणूक होत असलेल्या ग्राहक आपली कम्प्लेंट दाखल करण्यासाठी शहर पोलिस स्टेशनकडे गेला असता त्याच्याबरोबर घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकाराला त्रैयस्त व्यक्ती कडून फोन करून तुला प्रकरण जड जाईल अशी धमकी देण्यात आली.
हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांची भेट घेत सदर घटनेबाबत निवेदन देण्यात आले व बारामती शहर पोलिस स्टेशन यांना तक्रारी अर्ज देण्यात आला  या प्रकरणामध्ये विविध पत्रकार संघटनांनी देखील सहभाग घेऊन आपले निवेदन देत सदर घटनेमधील दुकान मालक व तेथील महिलेवर, पत्रकारांशी असभ्य वर्तणूक करून त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायदा कलम१९(अ)च्या अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली. या वेळी उपस्थित पत्रकार सुरक्षा दलाचे अध्यक्ष योगेश नालंदे, मन्सूर शेख, स्वप्नील कांबळे, मराठी पत्रकार संघाचे हेमंत गडकरी, पत्रकार संतोष कांबळे, संजय कांबळे, भारत तुपे, नितिन पवार, अमोल यादव, चेतन शिंदे, संदीप आढाव, निलेश जाधव, तांबे सर, गौरव अहिवळे, शुभम गायकवाड, निलेश निकम, गजानन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते योगेश महाडिक, काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर उपस्थित होते. तक्रारी अर्ज शहर पोलीस स्टेशनचे  प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज यादव यांना देऊन सदर घटनेची माहिती देण्यात आली या घटनेबाबत सखोल चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *