प्रतिनिधी – के.के. वाघ कृषी आणि कृषी संलग्न महाविद्यालये, नाशिक यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन केले होते, युवा महोत्सवात 7 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साक्षरता ललित कला आणि नाट्य अधिनियम अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. थिएटर ऍक्ट या मध्ये विद्या प्रतिष्ठानचे कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामतीने “वानवा ऍक्ट” मध्ये प्रथम पारितोषिक मिळविले. “वानवा ऍक्ट” हा विद्यार्थ्यानी सादर केला आणि त्याला, प्राचार्य डॉ. सुमन देवरुमठ, डॉ. बिपीन पाटील आणि प्रतीक्षा भगत आणि सर्व शिक्षक कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रतिक कदम श्रेयस गार्डी, वर्धन खोमणे, प्रेरणा घोडके, पुर्वी कारखिले, रोशनी जगताप, राधिका परदेशी यांनी अभिनय सादर केला. संस्थेचे विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अशोक प्रभुणे, सचिव अॅड नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार डॉ.आर.एम.शाह, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्टर कर्नल श्रीश कंबोज यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.