बारामती दि. ११ : बारामती तालुक्यामध्ये प्राधान्य कुटूंब व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत ८६ हजार ५९९ लाभार्थी आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतर्गत या शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमित्त १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो साखर व १ लिटर पामतेल या ४ शिधा वस्तूंचा समावेश असलेला १ शिधावस्तू संच ई-पास प्रणालीद्वारे वितरीत करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.
दरमहा मिळणारे नियमित धान्य व प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेअंतर्गत मिळणारे मोफत धान्यव्यतिरिक्त शिधा वस्तूंचा हा संच अतिशय स्वस्त दरात गोरगरीब जनतेला रास्त भाव दुकानात उपलब्ध असेल.
तालुक्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना शिधा संच प्रति शिधापत्रिका १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरीत करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी रास्त भाव दुकानांतून नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त सवलतीच्या दरात मिळणारा शिधा वस्तुंचा १ संच दिवाळीपूर्वी घेवून जावे, असे आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.