प्रतिनिधी – ग्रामपंचायत भिलारवाडी या ठिकाणी एक अनोखा उपक्रम करण्यात येत आहे. महिलांचा प्रशासनामध्ये तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग वाढावा यासाठी पहिली महिला सभा नुकतीच पार पडली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेत सुरुवात करण्यात आली. गावच्या सर्वांगीण विकासामध्ये महिलांचे स्थान वाढावे व महिला साक्षरतेचे प्रमाण वाढावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात असल्याचे सरपंच सत्वशीला जगताप यांनी सांगितले. या सभेच्या दरम्यान गावातील सर्व स्तरावरील महिला भगिनी उपस्थित होत्या यामध्ये महिला बचत गटाच्या सदस्या, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच गावातील जेष्ठ माता भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच सत्वशीला जगताप, ग्रामपंचायत सदस्य सुप्रिया काळाणे, ग्रामपंचायत सदस्य अलका पोंदकुले, ग्रामपंचायत सदस्य आशा खोमणे, अंगणवाडी सेविका विजया भिलारे व शालन चव्हाण तसेच आशा सेविका दिपाली शिंदे, ग्रामरोजगार सेवक स्वाती सोनवणे तसेच अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या. या सभेमध्ये युवतींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.