मला काहीतरी होतंय गेली दोन वर्षे झाली मला काय होत आहे समजतच नाही कशातच लक्ष लागत नाही काही करावेसे वाटत नाही अभ्यासावरचे लक्ष पूर्ण उडाले आहे आता असे वाटते जगून करायचे तरी काय मॅडम माझ्या मिस्टरांचे वागणे अलीकडे बदलले आहे कळत नाही काय झाले मी जसा जाणून घ्यायचा प्रयत्न करते तसा आमच्यातला दुरावा वाढत जातोय समजत नाहीये मी कसे राहायचे अशा अनेक समस्या आमच्या पुढे नेहमी येत असतात मुला मला काहीतरी होतंय पासून मुलाला मुलींपेक्षा मुलेच आवडतात इथपर्यंत…

महत्त्वाचा असूनही नेहमी दुर्लक्षित केला गेलेला आपल्या आरोग्याचा एक भाग म्हणजे आपले मानसिक आरोग्य कारण आपण नेहमी काळजी घेतो ते आपल्या शारीरिक आरोग्याची पण आपल्या मानसिक आरोग्याचे काय आपले मानसिक अस्वस्थ ठीक नसेल आपले आपले मानसिक अवस्था ठीक नसेल तर आपल्याला नैराश्य ताण तणाव चिंता वैचारिक समस्या अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आणि जसजशी आपण समस्या सोडवण्याचा विचार करतो तशी गुंतागुंत वाढतच जाते आणि आपल्या मनाची स्थिती अजून डोलायमान होते दुःख,निराशा,राग,भीती नकारात्मक विचार आत्महत्येचे विचार मनामध्ये येत जात असतात आणि त्यातील काही भावनांचा उद्रेक झाला किंवा तीव्रता वाढली की मानसिक आरोग्य ढासळते.

हळूहळू त्याचे परिणाम आपल्या आरोग्यावर नक्कीच होतात जागतिक आरोग्य संघटनेने हे मानसिक आरोग्याला तेवढेच महत्त्व दिले आहे, WHO ने आरोग्याची व्याख्याच अशी सांगितली आहे की आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे मानसिक समतोल किंवा स्वस्थता म्हणजे जीवनातील ताणतणाव सांभाळू शकणे व उत्पादक काम करणे.
मानसिक आरोग्य थोडे जरी बिघडले तर त्याचा परिणाम शैक्षणिक कामगिरीवर, रोजचे व्यवहार, व्यक्तिगत संबंध लैंगिक संबंध यावर होतो आजकाल लगेच व्यसनाधीन्तेकडे वळले जाते याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो.

सतत भीती चिंता अंग स्नायू मध्ये निष्कारण वेदना हृदयाचे ठोके अनियमित आणि जलद पडणे मळमळ चक्कर एकटेपणाची भावना थकवा पचनात्मक समस्या निद्रानाश आत्महत्येचे विचार अशी अनेक लक्षणे हे मानसिक आजाराशी निगडित आहेत पण खूप वेळेला आपल्याकडे हे कशामुळे होत आहे हे समजतच नाही अशा अनेक तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

विविध प्रकारच्या मानसिक समस्यांना आज तोंड द्यावे लागत आहे हे सर्व लक्षात घेता आता आपण फक्त शारीरिक दृष्ट्या नव्हे तर मानसिक दृष्ट्या निरोगी असणे गरजेचे आहे यासाठी वेळेत समुपदेशकाची किंवा मानसोपचार तज्ञांची मदत घेतली तर आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य ही निरोगी राहण्यास मदत होईल याशिवाय आपण स्वतःकडे छोटे छोटे उपाय करू शकतो याशिवाय आपण स्वतः काही छोटे-छोटे उपाय करू शकतो.
१) आपण एखादे ध्येय ठरवले तर ते सुरुवातीला आपल्या आवाक्यातील ठरवावे व एक पायरी पुढे करत पुढे कसे जाता येईल ते पहावे
२) मनातील भावना विचार तगमग दाबून न ठेवता कुठल्यातरी जवळच्या व्यक्तीजवळ बोलून दाखवावी नाही बोलू शकला तर समुपदेशकाची मदत घेण्यास काहीच हरकत नाही याने आपले मन हलकी होईलच शिवाय आपल्या समस्येवर एखादा चांगला उपाय आपणास मिळू शकतो किंवा समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून ती समस्या खूप छोटी वाटायला लागते जीवनात घडणाऱ्या 75 टक्के सकारात्मक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करून 25% नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो त्यामुळे समस्या वाढत जातात म्हणून सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे त्यातून पुढे कसे जाता येईल ते पहावे आपले छंद जोपासावेत,गाणी ऐकावीत निसर्गाच्या सानिध्यात रहावे. रोज सकाळी सकाळी किमान अर्धा तास योगा व ध्यान करायला हवे.ज्यामुळे शारीरिक आरोग्य तर चांगले राहतेच आणि मानसिक ताणतणाव जाणवत ना. मन शांत प्रफुल्लित प्रसन्न एकाग्र राहते अशा प्रकारे मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावून पुढे वाटचाल करूया…

स्मिता शहा मानसशास्त्रतज्ञ सायकॉलॉजिस्ट 8830507260

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed