प्रतिनिधी – सहेली उद्योजिका ग्रुप बारामती आयोजित तालुका स्तरीय गौरी आरास स्पर्धेत डोर्लेवाडीच्या श्वेताली सोमनाथ भिले यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ (ता.४) रोजी बारामती येथे आयोजित केला होता. निर्भया पथक प्रमुख पोलीस हवालदार अमृता भोईटे, मोरया पब्लिक स्कुलच्या अध्यक्षा अनिता गावडे, राष्ट्रवादी युवती शहर अध्यक्ष आरती शेडगे, वकिल सेलच्या सुप्रिया बर्गे स्पर्धेच्या आयोजक व बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेस उपाध्यक्षा रोहीणी खरसे-आटोळे, प्रियंका शेंडकर, अॅड माया पालेकर, हरिभाऊ आटोळे, सोमनाथ भिले आदींच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांक – डॉ.स्मिता गणेश बोके बारामती, तृतीय क्रमांक-सोनाली निलेश खारवडे बारामती यांनी मिळविला. पूजा सावता बोराटे, रेश्मा रवींद्र गडकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. कोविड काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या योगिता साळुंखे यांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मिलिंद भोपळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. यावेळी अमृता भोईटे,अनिता गावडे, रोहिणी आटोळे यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेतील सहभागी सर्वांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गौरी आरास स्पर्धेत पर्यावरण जागृती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, पारंपरिक सण उत्सवाचे महत्व, मोबाईलचे दुष्परिणाम, बेटी बचाव, बेटी पढाव आदी विषयांवर महिलांनी प्रबोधनपर देखावे सादर केले होते.