प्रतिनिधी – अंजनगाव येथे दुर्गादेवी नवरात्र उत्सवानिमित्त खेळ रंगला वहिनींचा अर्थात नवदुर्गांचा सत्कार समारंभ होम मिनिस्टर कार्यक्रम महिलांच्या सर्वांगीण कला गुणांना वाव देणारे एकमेव व्यासपीठ दुर्गादेवी नवरात्र उत्सव वर्तमळा येथे आयोजित करण्यात आले होते. गेली दोन वर्षे कोरोणाच्या काळामध्ये कुठलाही कार्यक्रम किंवा गाजावाजा करता येत नव्हता परंतु यावर्षी सर्व कार्यक्रम हसत खेळत चांगल्या पद्धतीने आयोजित करून नऊ दिवसांमध्ये होम मिनिस्टर दांडिया व इतर कार्यक्रम चांगल्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ, सविता बाळासाहेब परकाळे ,तसेच मा, उपसरपंच प्रदीप वायसे ,पोलीस पाटील ईश्वर खोमणे ,शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष भीमराव भोसले, मा, सरपंच दिलीप परकाळे ,अंजनगाव ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष दादासो कुचेकर, अमर सस्ते, यशपाल चव्हाण, अजित मोटे, सत्यवान कुचेकर, संपत मोटे, अरविंद परकाळे, पंकज काका मोरे ,जगताप यशवंत ट्रान्सपोर्ट बारामती, किरण मोरे, महेश मोटे, धनंजय वायसे, कुणाल सकट ,सचिन कुचेकर ,ऋषिकेश कुचेकर, गणेश लांडगे, प्रणव कुचेकर, प्रतीक कुचेकर, व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये होम मिनिस्टर संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेला सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक सौ राणी राजेंद्र चव्हाण यांना पैठणी विलास परकाळे तंटामुक्ती, अध्यक्ष यांच्या हस्ते देण्यात आली. द्वितीय क्रमांक सौ अमृता भगवान मोटे, कुकर भेट, मंगेश वायसे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार यांच्या हस्ते व तृतीय क्रमांक सौ,रेश्मा प्रशांत कुचेकर डिनर सेट, सरफराज शेख उद्योजक यांच्या हस्ते तर चतुर्थ क्रमांक ज्योती मोरे अंगणवाडी सेविका यांना भिंतीवरचे घड्याळ सौ, सविता बाळासाहेब परकाळे सरपंच, यांच्यातर्फे भेट देण्यात आले. अशाप्रकारे खेळ रंगला वहिनींचा हा कार्यक्रम सलीम सय्यद निवेदक यांनी पार पडला व आभार प्रदर्शन प्रशांत कुचेकर यांनी केले.