प्रतिनिधी – शिर्सुफळ बारामती येथील सोलर प्लांट यांच्या माध्यमातून सेक्युरीटी गार्ड यांच्या पगार कपात रद्द करून या दिवाळी पासून त्यांचा रेग्युलर पगार देण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ शिंदे यांनी केली. त्यांची होणारी फसवणूक थांबवावी कारण एकदा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्या नंतर पुन्हा अॅग्रीमेंट मधील रक्कम कमी होत नाही मग ती पगाराची रक्कम का कमी केली ? तसेच गरिबाची रक्कम व कॉन्ट्रॅक्ट अधिकारी यांनी काय केली ते सांगावे अन्यथा दिवाळी पासून त्यांची जुना पगार द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुषार भाऊ शिंदे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या कडे मागणी केली. तसेच परस्पर कामगार भरले जाऊ नये असे देखील सांगितले. यावेळी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच आप्पासाहेब आटोळे , संचालक नामदेवराव झगडे, प्रमोद बोराटे, उमेश जगताप, संचालक गणपत आटोळे , विश्वास आटोळे, माजी सरपंच अतुल हिवरकर , आदी उपस्थित होते.