बारामती शहरात गटारी अमावस्या निमित्त रविवारी मटन व चिकन पार्सल सुविधा सुरू राहणार …

बारामती (प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे) रविवार दि. 8/8/2021 रोजी गटारी अमावस्या असल्याने मटन व मांस विक्रीसाठी एकच दिवस मिळत आहे. दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होत असल्याने लोकांची अडचण होऊ नये यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ गालिंदे व कैलास ताडे, अध्यक्ष हिंदू खाटीक समाज बारामती यांनी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांची भेट घेऊन याविषयी निवेदन दिले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने प्रांत कार्यालयांनी रविवारी मटन व मांस पार्सल विक्रीसाठी परवानगी दिलेली असल्याने पार्थ गालिंदे व कैलास ताडे यांनी केलेल्या मागणीला यश आल्याने मटन व मांस विक्रेते व ग्राहक यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
सध्या कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दिवसेंदिवस कोरोणाची महामारी वाढत आहे. यासाठी शासनाने व प्रशासनाने बारामती शहर शनिवारी व रविवारी बंद ठेवलेले आहे. लोकांची अडचण होऊ नये यासाठी रविवारी मटण व मांस विक्री सुरू राहणे गरजेचे असल्याने प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस व बारामती शहरातील पार्थ प्रविण गालिंदे व कैलास ताडे, अध्यक्ष हिंदू खाटीक समाज बारामती यांनी निवेदन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *