प्रतिनिधी – बारामती शहर पोलीस ठाण्यात अनेक वर्षापासून बेवारस स्थितीत असलेल्या मोटरसायकलचा जाहीर लिलाव करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक यांना पोलिसांनी त्यांचे मालक शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही सदर मोटरसायकली नेण्यासाठी कोणी आले नाही म्हणून त्यांचा लिलाव करावा याबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर बाबत जाहीरनामाही निघालेला आहे. तरीसुद्धा तमाम लोकांना कळवण्यात येते की या सोबत आपल्याला एक लिंक पाठवत आहोत तरी आपली गाडी या बेवारस गाड्यांमध्ये आहे का याबाबत आपण खालील लिंक वर जाऊन माहिती घेऊ शकता आणि तशी जर आपल्याला आपल्या मोटरसायकलशी मॅच होणारी माहिती यामध्ये मिळाली तर आपण बारामती शहर पोलीस ठाणे शी किंवा जिल्हा वाहतूक शाखेची संपर्क करावा असे आवाहन बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.

आपली गाडी बेवारस गाड्यात आहे का त्यासाठी शोधण्यासाठी लिंक

https://puneruralpolice.gov.in/files/Flash/42.pdf

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed