डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानावर
४ ऑक्टोबर रोजी बारामती येथे प्रशिक्षण

बारामती दि. २ : कृषि विभाग महाराष्ट्र शासन, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी, कृषि विज्ञान केंद्र बारामती व बारामती तालुका सहकारी फलोत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र, बारामती येथे ४ ऑक्टोबर रोजी, सकाळी १०.०० वाजता डाळिंब उत्पादन तंत्रज्ञानावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक दिवशीय प्रशिक्षणास तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर व दौंड तालुक्यातील इच्छुक ङाळिंब उत्पादक शेतक-यांनी या प्रशिक्षणास त्यांच्या आधार कार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *