प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग रब्बी हंगाम प्रशिक्षण मोहिम 2022 – 23 अंतर्गत दिनांक 30 सप्टेंबर 2022 रोजी मौजे लाटे तालुका बारामती, येथे पार पडला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना राहुल भोसले यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा व रब्बी ज्वारी पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले, तसेच जमिनीचा सेंद्रिय कर्ब व ऊस पाचट व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण प्रकाश सापळे, एकरी 100 टन ऊस उत्पादन अभियान, सोयाबीन बीज प्रक्रिया, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, PMFME, MAHADBT अंतर्गत राबवण्यात येणार्या कृषी योजना व BBF पेरणी तंत्रज्ञान, MREGS फळबाग लागवड, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान – पौष्टीक तृणधान्य मध्ये रब्बी ज्वारी बियाणे वाटप करण्यात आले, यावेळी के बी चे शास्त्रज्ञ भोसले यांनी किड रोग, पिक संवर्धन, जमिनी सामू, सेंदीय शेती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले व काही प्रात्यक्षिके करुन दाखवली. यावेळी लाटे गावचे सरपंच श्री उमेश साळुंके, ग्रा प सदस्य श्री प्रशांत खलाटे, सो स. सा का चे मा. संचालक श्री सचिन खलाटे, सेवा सोसायटीचे चेअरमन श्री अशोक खलाटे, लक्ष्मण जाधव, गणपत खलाटे, महादेव साबळे, किशोर खलाटे, संभाजी खलाटे, दिपक खलाटे व इतर शेतकरी बंधू उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कृषि सहाय्यक राहुल भोसले यांनी केले.