बारामती,दि ३०: संजय गांधी निराधार अनुदान 
योजना लाभार्थी निवडीसाठी आज प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ३४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत एकूण ३७४ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या २६३ प्राप्त अर्जापैकी २५३ मंजूर तर १० अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ९६ प्राप्त अर्जापैकी ८१ अर्ज मंजूर तर १५ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त १३ अर्ज मंजूर करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब योजनेचे २ अर्जापैकी १ अर्ज मंजूर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *