प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत रब्बी हंगाम प्रशिक्षण मौजे खामगळवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे दिनांक 29/ 9 /2022 रोजी घेण्यात आला, यावेळी वडगाव मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी श्री मोरे यांनी रब्बी हंगाम तंत्रज्ञान विषयी माहिती दिली. तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड फळपिक, विमापिक, विमा शेतकरी, अपघात विमा, पीएम एफएम ई महाडीबीटी मधील सर्व योजनांची माहिती व रब्बी हंगामातील पिकाविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी केबी एक्सपोर्ट कंपनीचे श्री भोसले उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजीपाल्या व मका याविषयी सविस्तर माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक स्वाती कोकणे केले तर रणजित खामगळ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *