योजनेचे स्वरुप
वैरण व पशुखाद्य यामध्ये उद्योजकता विकास करून मागणी व पुरवठ्यातील अंतर कमी करण्यासाठी वैरण प्रक्रिया युनिटची स्थापना करण्यास प्रोत्साहन देणे. वैरण व पशुखाद्य तंत्रज्ञानाचा प्रथम दर्शनी प्रत्यक्षिकाद्वारे प्रचार, प्रसार, व विकास करून स्थानिक पातळीवर किफायतशीर किमतीमध्ये वैरणीची उपलब्धता वाढवणे.
योजनेच्या अटी
●खासगी उद्योजक, स्वयंसहाय्यता बचत गट, शेतकरी उत्पादित संस्था , शेतकरी सहकारी संस्था, सहकारी दूध उत्पादक संस्था, संयुक्त दायित्व गट आणि कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्या या योजनेच्या अनुदानास पात्र आहेत.
●योजनेच्या लाभाकरिता सर्वसाधारण २ एकर स्वतःच्या मालकीची जमीन असावी किंवा जमिनीचा किमान १० वर्षांचा नोंदणी कृत भाडेपट्टी करार असावा.
●लाभार्थ्यांकडे केवायसी साठी संबंधित कागदपत्रे असावीत.
●लाभार्थ्यांना सायलेजबेलर युनिट, (क्षमता २००० ते २४०० में. टन प्रति वर्ष) ड्रायफॉडर ब्लॉक युनिट (क्षमता ३० में. टन प्रतिदिन) टोटल मिक्स रॅशन (टीएमआर) युनिटची स्थापना करावी लागेल.
योजनेअंतर्गत लाभ
◆ एका प्रकल्पाकरीता एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान जास्तीत जास्त ५० लाखापर्यंत अनुदान दिले जाईल.
◆ अनुदान दोन समान हप्त्यामध्ये दिले जाईल.
◆ प्रकल्प किमतीच्या १५ टक्के उद्योजक अथवा उद्योजक संस्थने खर्च करावयाचा असून उर्वरित ३५ टक्के रक्कमेसाठी बँक कर्ज घ्यावे लागेल. या बँक कर्जाकरिता उद्योजक अथवा उद्योजक संस्था पशुसंवर्धन पायाभूत सुविधानिधी (एएचआयडीएफ) व्याजात सवलत घेऊ शकतील.
अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा