प्रतिनिधी – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे
भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती – यू-ट्यूब चॅनेलवरून शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आहे शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा खजिना
शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम बळीराजा तुझ्यासाठी हा उपक्रम. सध्य परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना वातावरणातील बदलामुळे होणारे पिकाचे नुकसान, उच्च तंत्रज्ञान आधारित पीक उत्पादन पद्धती, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, विषमुक्त भाजीपाला उत्पादन तसेच पिकाचे काढणी पश्च्यात व्यवस्थापन , कोंबडी पालन, शेळी पालन, डेअरी उद्योग , तृणधान्य , कडधान्य व भरडधान्य, बिजोत्पादन, शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना , जेविक खते व औषध यांचा पिक उत्पादनामध्ये वापर तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या शेतकरी कल्याणासाठी असणाऱ्या विविध शासकीय योजना या सर्वांची माहिती असणे व सोप्या पद्धतीने कमी खर्चामध्ये उपलब्ध होण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बारामती घेऊन येत आहे – शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान माहितीचा खजिना युट्यूब चॅनलवरून “ बळीराजा तुझ्यासाठी” या कार्यक्रमाच्या स्वरुपात. या कार्यक्रमामध्ये प्रत्त्येक महिन्यात ४ – ५ कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये कृषी शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासन कृषी विभाग अधिकारी , नवीन उद्योजक , निर्तायदार , फळे व भाजीपाला प्रक्रियादार, पीकनिहाय लागवड ते काढणी पर्यन्तचे माहिती व प्रगतशील शेतकरी हे सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. आणि घरबसल्या शेतकऱ्यांना त्यांचे वेळेनुसार व गरजेनुसार तंत्रज्ञानाचा प्रचार , प्रसार माहिती मिळेल. या कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन दि.२६.०९.२०२२ रोजी आयोजित पहिला कार्यक्रम श्री. विलास शिंदे, चेअरमन – सह्याद्री फार्मस, नाशिक हे फळशेतीमधील आव्हाने व संधी याविषयी माहिती देणार आहेत. शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार व मिळणाऱ्या अभिप्रायनुसार इतर गरजेचे कार्यक्रम सुद्धा येणाऱ्या काळात आयोजित केले जाणार आहेत. कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे श्री. यशवंत जगदाळे यांनी या नवीन कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन मा.राजेंद्र पवार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.निलेश नलावडे तसेच डॉ. धीरज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *