योजनेचे स्वरुप

शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात, विमा योजनेंतर्गत शेतकऱ्याचा मृत्यू ओढावल्यास किंवा अपंगत्व आल्यास गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमार्फत शेतकऱ्यास व त्याच्या कुटुंबास आर्थिक साहाय्य देण्यात येते.

योजनेच्या अटी

◆रस्त्यावरील व रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का अपघात, विज पडून मृत्यू, खुन, उंचावरून पडून झालेला अपघात वा मुन्यू, सर्पदंश, विंचू दंश, जनावरांच्या चावण्यामुळे, रेबीज होवून मृत्यू, जखमी होवून अपंगत्व, जनावरांच्या हल्ल्यात मृत्य, दंगल व अन्य कोणतेही अपघात यामध्ये समाविष्ट आहेत.
◆ अपघात झाल्यानंतर ४५ दिवसाच्या आत दावा नोंदवणे आवश्यक आहे.
◆१० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार नसलेला शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक अशा एकूण दोन जणांना लाभ घेता येईल.

योजनेअंतर्गत लाभ


◆अपघाती मृत्यू, अपघातामुळे २ डोळे, अथवा २ अवयव निकामी होणे व अपघातामुळे दोन अवयव निकामी उदा. १ डोळा व १ निकामी होणे यासाठी २ लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळेल.
◆ अपघातामुळे १ डोळा अथवा १ अवयव निकामी होणे यासाठी १ लाख आर्थिक सहाय्य मिळेल.

अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed