प्रतिनिधी – केंद्रीय पत्रकार संघ व प्रयास वेल्फेअर फाउंडेशन यांच्यावतीने चंदननगर पोलीस स्टेशन मधील कर्तव्यनिष्ठ अशा पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला हा गौरव त्यांनी केलेल्या करोना काळातील कामाचे कौतुक म्हणून करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांना व चंदननगर पोलीस स्टेशन मधील कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी पोलीस अंमलदार मा.श्री. नानासाहेब पतुरे, पोलीस अंमलदार मा.श्री रवींद्र आहेर, पोलीस अंमलदार मा.श्री.मच्छिंद्र शिरसाट, पोलीस अंमलदार मा.श्री.सुभाष आव्हाड,पोलीस अंमलदार मा. श्री. अतुल आदक, महिला पोलीस अंमलदार सौ. रेश्मा केदार सौ. वैशाली इंगळे, सौ. अश्विनी कामठे, सौ. सुनंदा सावंत, सौ. राजश्री घुले यांना केंद्रीय पत्रकार संघ व प्रयास वेल्फेअर फाउंडेशन च्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले
या अनुषंगाने चंदन नगर परिसरातील गणेश मंडळे व नवरात्र उत्सव कमिटी मंडळांना बोलवून त्यांचेही चंदन नगर पोलीस स्टेशन व केंद्रीय पत्रकार संघ प्रयास वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी चंदन नगर परिसरातील १६४ मंडळांपैकी पाच मंडळांना पारितोषिक देण्यात आले शिवगणेश मित्र मंडळ, अमर मित्र मंडळ, भैरवनाथ तरुण मित्र मंडळ, महेंद्र व्यापारी मित्र मंडळ, चंदननगर मित्र मंडळ, या 5 मंडळांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला
या वेळी मा. श्री. रोहिदास पवार (पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर ) मा.श्री. किशोर जाधव ( सहा.पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर) मा.श्री. राजेंद्र लांडगे ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदन नगर पोलीस स्टेशन) मा.श्री रवींद्र कदम ( पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंदन नगर पोलीस स्टेशन) केंद्रीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. नितीन (आण्णा) पुंडे, विघ्नहर्ता न्यास झोन ४ चे समन्वयक विवेक देव व झोन १ चे समन्वयक श्री आशिष गांधी व श्री अगरवार तसेच टीम लीडर विजय लोखंडे व टीम लीडर श्री सुधाकर पांडे. प्रयास वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष मा. सौ. रुपालीताई शिंदे, सौ प्रतीक्षा भनगे l, श्री राजेंद्र दळवी, श्री अभिषेक कुमार, आयडल्स कराटे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मास्टर.श्री.धनंजय शिंदे, संगीता सामाजिक संस्थे च्या संस्थापक अध्यक्ष सौ.निशा (नाणी) सुक्रे, भिमरत्न माथाडी च्या संस्थापक अध्यक्ष सौ.आरती ताई साठे तसेच चंदन नगर पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीचे सदस्य व महिला दक्षता कमिटीच्या महिला सदस्या उपस्थित होते