दररोज होणाऱ्या पेट्रोल चोरीमुळे नागरिक त्रस्त…
(प्रतिनिधी -दि.23 ) तांदुळवाडी आणि परिसरात नव्याने विकसित होणाऱ्या इमारतींचे प्रमाण वाढत असून बारामती नगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेला हा भाग झपाट्याने विकसित होत आहे. या भागातील भाडेकरूंची वाढती लोकसंख्या विचारात घेता प्रशासनाचे मूलभूत सोयी सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. एमआयडीसी भाग येथून जवळ असल्याकारणाने या भागात बाहेर गावचे लोकं मोठ्या प्रमाणात आहेत. या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यापैकी सर्वात मोठी समस्या परिसरातील काही इमारती मध्ये दररोज पेट्रोल चोरी, सायकल चोरीसारखे प्रकार घडत असून भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे नोकरदार वर्ग मानसिक त्रास, आर्थिक झळ यात त्रस्त झाला आहे.
क्रमशः …… भाग 1