प्रतिनिधी – 20 सप्टेंबर रोजी सकाळी पहाटे 6 वाजता तुकाराम शिपकुले यांना हरीण जखमी अवस्थेत शिपकुलेवस्ती (पारवडी-बारामती) या ठिकाणी दिसले, त्यांनी लगेच याची कल्पना… पांडुरंग शिपकुले याना दिली त्यांनंतर पांडुरंग शिपकुले यांनी घटना स्थळी जाऊन हरीण पाहितल्या नंतर हरीण पूर्ण पणे थंड पडलेल्या अवस्थेत होते, वरून पाऊस चालू होता, वातावरण थंडीचे होते, हरीण कोणत्याही प्रकारची हालचाल करत नव्हते, चारही पाय थंडी मुळे पूर्ण पने आखडलेले होते, पांडुरंग शिपकुले यांनी पारवडी गावचे पोलीस पाटील यांना फोन करून घटनेची माहिती दिली व शिपकुले यांनी हरीण स्वताच्या घरी घेऊन आले हरीण पूर्ण भिजलेले असल्या मुळे त्याला पांडुरंग शिपकुले यांच्या पत्नी आरती पांडुरंग शिपकुले यांनी टॉवेल नि पुसून घेतले व चादर आणि ब्लॅंकेट मध्ये गुंडाळले त्या मुळे उष्णता निर्माण होण्यास मदत झाली. शिपकुले आणि गावचे पोलिस पाटील यांनी बारामती वनअधिकारी लोणकर मॅडम यांच्याशी संपर्क साधला, लोणकर मॅडम यांनी RESQ टीम शी संपर्क साधून काळंगे व जरांडे यांना घटनास्थळी पाठवुन दिले सोबतच RESQ टीम चे डॉ.श्रेयस व त्यांची टीम व्हॅन सोबत घटनास्थळी पोहोचले. ज्या हरणांना उन्हाळ्यात पांडुरंग शिपकुले यांनी पाणवठ्या द्वारे पाणी पाजले त्याच हरणाचे पावसाळ्यात जीव वाचवल्याने परिसरात पांडुरंग शिपकुले यांचे कौतुक होत आहे.