प्रतिनिधी : राज्य कृषी विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ज्वारी प्रकल्प बियाणे वाटप केले . शिर्सुफळ येथे मंडळ कृषी अधिकारी यमगर,सरपंच आपासो आटोळे, यांच्या मार्गदर्शन खाली हा कार्यक्रम पार पडला. कृषी पर्यवेक्षक अंनत घोळवे यांनी शेतकऱ्यांना ज्वारी पेरणी करताना गंधक ४ ग्रॅम (३०० मेश) प्रतिकिलो बियाणे त्यानंतर अॅझेटोबॅक्टर २५ मिली आणि पीएसबी २५ मिली प्रतिकिलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे आवाहन केले. पेरणीसाठी बीबीएफ यंत्राचा वापर करावा. जेणेकरून बियाणे आणि खत पेरणीवेळी देणे शक्य होईल आणि पेरणी योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर होईल. त्याचा फायदा उत्पन्न वाढीसाठी होईल, असे यावेळी सांगण्यात आले. मौजे शिर्सुफळ येथे ज्वारी मका बीजप्रक्रिया, प्रात्यशिक करण्यात आले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य विश्वास आटोळे सोसायटी चेअरमन महादेव बापूराव आटोळे कृषि सहाय्यक सोमनाथ वाघचौरे, कृषीमित्र आणसो आटोळे व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed