शॉपिंग व फूड फेस्टिवल बारामतीकरांच्या प्रचंड प्रतिसादात आणि उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – संकल्प ऑर्गनायझेशनच्या वतीने दिनांक 17 व 18 सप्टेंबर 2022 रोजी महावीर भवन बारामती येथे दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शॉपिंग व फूड फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलचे उद्घाटन एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विशस्त सुनंदा वहिनी पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मा.नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे व भारती मुथा आणि भगिनी मंडळ विश्वस्त सुनिता शहा देखील यावेळी उपस्थित होत्या.

सुनंदा वहिनी पवार मार्गदर्शनपर बोलत असताना म्हणाल्या की, गृहिणींनी उद्योजकतेकडे वळाले पाहिजे ज्या महिला चांगले खाद्यपदार्थ बनवितात त्यांनी फूड लायसन्स देखील काढले पाहिजे आणि तांत्रिक गोष्टीची पूर्तता करून व्यवसायात भरारी घेतली पाहिजे.
संकल्प ऑर्गनायझेशन ने दिलेल्या या व्यासपीठाचा वापर करून सर्वजणींनी व्यवसाय करण्यास सज्ज झाले पाहिजे असे विचार सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

या शॉपिंग अँड फूड फेस्टिवल च्या वेळी घेण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, मम्मा अँड किड्स कॉम्पिटिशन, डान्स कॉम्पिटिशन ला देखील बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याची माहिती आयोजक सरिता मुथा,योगिता पाटील आणि स्मिता शहा यांनी दिली

डान्स कॉम्पिटिशनच्या जज म्हणून सिमरन शहा आणि सचिन मांढरे यांनी काम पाहिले तर ममा & किड्स competition चे जज म्हणून सुनीता शहा,
Dr.माधुरी राऊत यांनी व फॅन्सी ड्रेस competiton जज म्हणून रुबी खत्री, अलका खाटेड यांनी जबाबदारी पार पाडली.
या कार्यक्रमासाठी गांधी ज्वेलर्स,दिया सिल्क व सुप्रिम फर्नीचर यांचे सहकार्य लाभले. रत्नावली घोगरदरे यांच्या बहाररदार सूत्रसंचालनाने सर्व स्टॉल धारकांना मंत्रमुग्ध केले.

संकल्प ऑर्गनायझेशनच्या वतीने भविष्यात देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन व्हावे अशी Stoll धारकांची ईच्छा दर्शविली. तसेच बारामतीकरांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आयोजकांनी बारामतीकरांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी शेतकरी योद्धा यांनी मीडिया पार्टनर म्हणून जबाबदारी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *