प्रतिनिधी – दिनांक. १७/०९/२०२२ रोजी मौजे भिगवण गावचे हददीत रात्रगस्त करताना दोन संशईत इसम
आपले अस्तित्व लपवुन आंधारामध्ये फिरत असताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवून त्यांची झडती घेतली असता त्यांचेजवळ एक लोखंडी धारदार कोयता व लोखंडी गज, एक ज्युपिटर मोटार सायकल मिळुन आली. त्यांचकडे अधिक विचारपुस केल्यावर ते उडवा उडविची उत्तरे देवु लागले त्यामुळे त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांची नावे १) चैतन्य पांडुरंग शेळके, वय. २० वर्ष, २) किशोर सहदेव पवार, वय २० वर्ष, दोघे रा. भोत्रा, ता.परांडा, जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगुन सांगितले की, त्यांचे जवळ मिळुन आलेली ज्युपिटर मोटार सायकल ही वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे हददीतुन तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे हदद्दीत ट्रॅक्टर चालकाला आडवुन त्यास मारहाण करून त्यांचे जवळील रोख रक्कम व ट्रॅक्टर जबरीने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांचे जवळ मिळुन आलेले मोबाईल हे त्यांनी परंडा येथुन चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांचेवर भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर. २३०/२०२२, मुंबई पोलीस अधिनियम कलम १२२ प्रमाणे कारवाई करून त्यांचेकडुन ४५,१३०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगस्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी मा. डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण मा. मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सचिन कांडगे, सहा. पोलीस निरीक्षक, भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टेचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, विनायक दडस पाटील, पोलीस अंमलदार समीर करे, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, अजित सरडे, होमगार्ड आप्पा सातपुते, लक्ष्मण ढवळे, पोलीस मित्र रवी काळे, सिधु आळंदकर, अशोक सुळके यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed