बारामती: राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक-नाबार्ड,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,पुणे व यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे माध्यमातून व छत्रपती कारखाना संचालक ढवाण पाटील यांचे प्रयत्नातून पिंपळी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी आर्थिक साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५७ महिला व नागरिकांनी बचत खात्याचे फॉर्म भरले. उर्वरित नागरिकांचे बॅंकेमार्फत फॉर्म भरले जाणार आहेत.
बारामती आर्थिक साक्षरता तालुका समन्वयक शामल जगताप यांनी ग्रामस्थ,शेतकरी,महिला,बचत गटातील महिला,जेष्ठ नागरिक,युवक-युवती आणि शालेय विद्यार्थ्यांची नाबार्ड व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा- बारामती व जळोची शाखेच्या वतीने नवीन बचत खाती उघडून घेतली. त्यांना दोन लाखांचा विमा, बँकेचे एटीएम कार्ड व बँकेचे शैक्षणिक कर्ज, सोनेतारण कर्ज, गृह कर्ज ,आपत्कालीन कर्ज, व्यापारी नजर गहाण कर्ज तसेच इतर विविध बँकेची कर्ज आणि अन्य योजनाबाबत सविस्तर माहिती देवून जागृती केली. वीस रुपयांमध्ये मिळत असलेल्या विम्याचे महत्व त्यांनी महिला व नागरिकांना सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरपंच मंगल केसकर यांनी बँकेचे अधिकारी व उपस्थित नागरिकांचे स्वागत केले.
सदरचा उपक्रम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बारामती शाखेच्या वतीने व्यवस्थापक प्रियंका खोमणे, जळोची शाखेचे व्यवस्थापक जगताप, बारामती विकास अधिकारी डी.एस.टकले,एस.ए.जगताप यांचे यांचे सहयोगातून होत असून पिंपळी येथे कॅम्प यशस्वी होणेकामी ग्रामपंचायत सदस्या अश्विनी सुनिल बनसोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषराव ढवाण पाटील,सरपंच मंगल केसकर, बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात, सदस्य अश्विनी बनसोडे, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सानिया इनामदार,हरिभाऊ केसकर,अशोकराव ढवाण, पप्पू टेंबरे,आनंद निंबाळकर, दत्तात्रय ढवाण,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनकर आदींसह पिंपळी-लिमटेक मधील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार अशोक ढवाण यांनी मानले.