भिगवण प्रतिनिधी – मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून भरकटला गेलाय.सर्व समाज आपल्या मुलाच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकांकडे मोठ्या आशेने पाहतोय,असे असताना विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांना आमदार दत्तात्रय भरणे यांचे हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.भिगवण येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता ९ वी ते पदवी पर्यंतच्या पाचशे विद्यार्थ्यांना
पाच हजार वह्यांचे वाटप करण्यात आले
यावेळी मा.राज्यमंत्री भरणे यांनी
या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत अशा समाजोपयोगी उपक्रमातुन विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडण्यास मदत होणार असून विद्यार्थी हितासाठी सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले
या कार्यक्रमासाठी हनुमंत बंडगर,शंकरराव गायकवाड, ऍड.महेश देवकाते,रमेश धवडे,बापूराव थोरात,सचिन सपकाळ,मनोज राक्षे,राजेंद्र हगारे,भोला शेलार,सतीश वाघ, आबासाहेब देवकाते,किरण रायसोनी,अजिंक्य माडगे,धनाजी थोरात,सतिश शिंगाडे,सचिन बोगावत,विशाल पाचांगणे, आकाश उंडाळे,भैय्या दराडे, अजय भिसे,राजू गाडे,सिताराम लांडगे,अमोल देवकाते, पोपट लांडगे,अनिकेत भिसे,दत्तू साठे, रामभाऊ कसबे,विद्यार्थी विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.अजय भिसे यांनी मनोगत व्यक्त केले ,प्रास्ताविक कृष्णा भिसे यांनी तर तुकाराम पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.