प्रतिनिधी – कृषि विज्ञान केंद्र बारामती ,महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) संयुक्त विद्यमाने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी अंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान व फुलशेती व्यवस्थापन या विषयावरील कौशल्य आधारित प्रशिक्षण व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका कृषि अधिकारी ,भोर श्री.देवेंद्र ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाई ऍग्रो टुरिझम , कासुर्डी खेबा ता. भोर जि. पुणे येथे करण्यात आले. प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र बारामती येथील विषय विशेषज्ञ श्री.यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ – उद्यानविद्या तसेच प्रमुख शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कोरडवाहू फळपिके (अंजीर व सिताफळ), जाधववाडी, ता.पुरंदर श्री.प्रदीप दळवी, मंडळ कृषि अधिकरी श्री.राजेंद्र डोंबाळे, कृषि सहाय्यक श्री.विनायक पारठे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.लक्ष्मीकांत कणसे उपस्थित होते. या कार्यक्रमात कृषि विभागामार्फत श्री.व्ही.टी. पारठे कृषि सहाय्यक -वेळु यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. श्री.राजेंद्र डोंबाळे मंडळ कृषी अधिकारी नसरापूर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली तसेच कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. श्री.यशवंत जगदाळे, विषय विशेषज्ञ कृषि विज्ञान केंद्र बारामती यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आंबा, पेरू, सीताफळ या फळपिकांविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले यामध्ये फळपिकांच्या वाणाची निवड, खत व कीड रोग व्यवस्थापन, बहार धरणे, छाटणी करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच फुलशेती, जैविक खते, किटकनाशके, बुरशीनाशकांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. प्रदीप दळवी, प्रमुखशास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प कोरडवाहू फळपिके (अंजीर व सिताफळ), जाधववाडी, ता.पुरंदर यांनी अंजीर , सीताफळ व पेरू उत्पादनामध्ये शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या व त्याचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सौ.शिवगंगा घुले, श्री.बाळासाहेब घुले, श्री.शिवाजी पांगारे, श्री.शिवाजी वाडकर यांनी आपले फळबाग उत्पादन याबाबतचे मनोगत व्यक्त केले. त्यांनंतर श्री.कैलास विष्णू वाडकर यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष पेरू फळबाग व फुलशेतीस भेट देऊन मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मा.उपसभापती पंचायत समिती भोर श्री.अमोलभाऊ पांगारे, प्रगतशील शेतकरी श्री.सचिन कोंडे, श्री.गुलाब घुले, रघुनाथ डिंबळे, मा. सरपंच कासुर्डी खेबा श्री.दत्तात्रय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच पंचक्रोशीतील फळबाग उत्पादक शेतकरी व शेतमजूर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed